Pune News : शिक्षण समितीवर 13 सदस्यांची नियुक्ती ; भाजपचा वरचष्मा

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर शिक्षण समिती स्थापन करण्यात आली होती. त्यावर पक्षनिहाय 13 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

मंगळवारी मुख्य सर्वसाधारण सभा ऑनलाइन पार पडली. यामध्ये प्रभारी नगरसचिव शिवाजी दौंडकर यांनी नवनिर्वाचित सदस्यांच्या नावांची घोषणा केली. पक्षाच्या सदस्य संख्येवर नियुक्ती झाली. त्यानुसार शिक्षण समितीवर भाजपाचा वरचष्मा राहणार आहे.

या समितीत भाजपचे सर्वाधिक सात सदस्य, तर राष्ट्रवादीचे चार आणि काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एका सदस्याला संधी मिळाली आहे.

नवनिर्वाचित सदस्य खालील प्रमाणे

_MPC_DIR_MPU_II

भाजपा : मंजुश्री खर्डेकर, कालिंदा पुंडे, राजश्री काळे, मुक्ता जगताप, मारूती तुपे, अल्पना वर्पे, वर्षा साठे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी : सुभाष जगताप, लता धायरकर, बाबुराव चांदेरे, सुमन पठारे.

काँग्रेस : अविनाश बागवे.

शिवसेना : प्राची आल्हाट.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.