Pune News : अजित देशमुख यांची निवडणूक विभाग प्रमुखपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या निवडणूक विभागाचा पदभार घनकचरा विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

महापालिकेची मुदत फेब्रुवारी 2022 मध्ये संपत आहे. यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून तयारी सुरू करावी लागणार आहे. कोरोनामुळे औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरारसह काही महापालिकांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतरही निवडणुका होउ शकल्या नाहीत. वरिल सर्व महाापलिकांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्या कोरोनाची लाट आटोक्यात आल्याचे चित्र दिसत असले तरी तिसरी लाट येण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या जातील, असा तर्क व्यक्त करण्यात येत आहे.

मात्र, याबाबत राज्य निवडणूक आयोगाने अद्याप काहीच घोषणा केलेली नाही, त्यामुळे महापालिकेने नेहमीप्रमाणे आठ महिने अगोदरच तयारीला सुरूवात केली आहे. निवडणूक विभागाच्या प्रमुखपदी अजित देशमुख यांची नियुक्ती हा त्याचाच एक भाग आहे.

महापालिकेच्या निवडणूक विभागाचा कार्यभार मालमत्ता व्यवस्थापन प्रमुख उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्याकडे होता. उप जिल्हाधिकारी असलेले मुठे यांचे प्रमोशन झाले आहे. त्यांची प्रलंबित बदली लवकरच होण्याची शक्यता आहे. यामुळे सहा महिन्यांपुर्वीच पुणे शहरात बदलीवर आलेले उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्याकडे निवडणूक विभागाची धूरा सोपविली असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादी, प्रभाग रचना, आरक्षण सोडतीपासून संपुर्ण प्रक्रिया देशमुख यांच्या माध्यमांतूनच होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.