-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : खासदार गिरीश बापट यांची पुणे विभागीय रेल्वे ग्राहक सल्लागार समिती अध्यक्षपदी नियुक्ती

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : पुणे लोकभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांची पुणे विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

रेल्वे तर्फे विभागीय सल्लागार समित्या नेमल्या जातात. रेल्वेच्या कामकाजात या समितीला उच्चस्तरीय समिती मानले जाते. पुण्यासाठीही पुणे विभागीय सल्लागार समिती असून त्या अंतर्गत पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा समावेश होतो.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

या पुणे विभागीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी खासदार गिरीश बापट यांची एकमताने निवड करण्यात आली. समितीची बैठक व्हर्च्युअल पद्धतीने झाली. त्यात खासदार श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीनिवास पाटील, डॉ. अमोल कोल्हे सहभागी झाले होते.

बैठकीत पुणे-नाशिक लोहमार्ग, पुणे-लोणंद लोहमार्गावरील भूसंपादन आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा झाली. यापुढील काळात केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा करुन रेल्वेचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन खासदार बापट यांनी दिले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1