Pune News : भाजपच्या महाराष्ट्र ‘प्रदेश उपाध्यक्षपदी’ ज्येष्ठ नगरसेविका वर्षा तापकीर यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र ‘प्रदेश उपाध्यक्षपदी’ ज्येष्ठ नगरसेविका वर्षा तापकीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तापकीर यांची पुणे महानगर पालिकेत काम करण्याची तिसरी टर्म असून स्थायी समिती, शहर सुधारणा, महिला व बाल कल्याण समितीमध्ये सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले आहे.

महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी केलेले सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेत भाजपने त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र नुकतेच प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी तापकीर यांना दिले.

नगरसेविका तापकीर यांच्या नियुक्तीबद्दल पालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्ष संघटनेच्या वाढीसाठी मोठा उपयोग होईल, असा विश्वास बिडकर यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.