Pune News : सुनील कर्जतकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पक्षाचे विभागीय संघटक ते राज्याचे सह संघटन मंत्री म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेले पुण्याचे सुनील कर्जतकर यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती केली असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

उपाध्यक्षपदासोबतच त्यांच्याकडे राज्यातील निवडणुकांचे समन्वयक म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते नवीन जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.