Pune News : रेल्वे मेल सर्व्हिसमध्ये नोकरी लावतो म्हणत पावणे अकरा लाखांची फसवणूक करणारे गजाआड

एमपीसी न्यूज – रेल्वे मेल सर्व्हिस (आरएमएस) मध्ये नोकरी लावतो हे आमिष दाखवून तब्बल 10 लाख 81 हजार रुपायांची फसवणूक करणाऱ्या टोळीला ( Pune News ) गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे.

योगेश संतराम माने व निलेश संतराम माने अशी अटक आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात फिर्यादी यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

Loni Kalbhor News : प्रेम संबंधातून तरुणाची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना रेल्वे मेल सर्व्हिस मध्ये नोकरी लावतो अशे आमिष दाखवले, त्यासाठी त्यांनी पुणे रेल्वे स्टेशन येथील रेल्वे मेल सर्व्हिस सेक्शन या छिकाणचे बनावट स्वाक्षरीचे व भारतीय रेलची मुद्रा असलेले जॉइनिंग लेटर बनवले. त्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडून रोख, गुगल पे द्वारे असे एकूण 10 लाख 81 हजार रुपये घेत नोकरी न लावता फसणूक केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला असता पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व पोलीस अंमलदार पांडुरंग पवार यांना बातमी मिळाली की आरोपी हे दुचाकीवरून आले असून ते सध्या पुणे रेल्वे पार्सल गेट समोर येणार आहेत. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून ( Pune News ) पोलिसांनी 8 कागदी लिफाफे ज्यामध्ये खोटी रेल्वेची नियुक्ती पत्रे, 4 बँकेचे चेकबुक, 5 पासबुक, 3 कोरे लिफाफे, 10 सेंट्रल रेल्वेचे खोटी नियुक्तीपत्रे,दोन मोबाईल, आयकार्ड कव्हर, 2 रेल्वेचे बनावट आयकार्ड,लेस हुक असा एकूण 99 हजार 500 रुपयांचा ऐवज मिळून आला.

आरोपी विरोधाात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.