Pune News: पाळीव कुत्र्या वरून शेजाऱ्यांमध्ये भांडण, तीन महिलांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – पाळीव कुत्रा शेतात शिरल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबाची या गावात 29 सप्टेंबर रोजी हा. याप्रकरणी 39 वर्षीय व्यक्तीने लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी यांची घरे जवळ आहेत. आरोपींचा पाळीव कुत्रा फिर्यादी यांच्या शेतात जाऊन पिकाचे नुकसान करतो. याची माहिती त्यांनी आरोपीच्या कुटुंबीयांना दिली असता आरोपी कुटुंबातील पाच सदस्यांनी एकत्र येऊन पीडित कुटुंबीयांना जबर मारहाण केली. शिवाय फिर्यादीच्या कुटुंबातील दोन महिलांचा विनयभंग आरोपीच्या कुटुंबातील व्यक्तींनी केलाय.

लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी एकाच कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरज बंडगर करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.