_MPC_DIR_MPU_III

Pune News : कोरेगाव भीमा हल्लेखोरांना अटक करा : रिपब्लिकन युवा मोर्चा

एमपीसी न्यूज : दोन वर्षांपुर्वी कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी आलेल्या आंबेडकरी जनतेवर समाजकंटकांनी हल्ला केला होता. या हल्ल्याला आणि दंगलीला जबाबदार असणाऱ्या मुख्य सुत्रधारांसह इतर आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिला आहे.

_MPC_DIR_MPU_II

या मागणीसाठी आज (24 डिसेंबर) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी डंबाळे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार हल्ल्यातील आरोपींना पाठीशी घालत होते. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी असा आरोप करत होते. आता त्यांचेच सरकार आहे. तरीही आरोपींना का अटक केली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1