Pune crime News : बॉडी बिल्डर तरुणांना उत्तेजनासाठी औषध विक्री करणा-याला अटक

एमपीसी न्यूज – बॉडी बिल्डर तरुणांना उत्तेजनासाठी औषध विक्री करणा-या एकाला गुन्हे शाखेने अटक केली. धक्कादायक म्हणजे हे औषध कमी रक्तदाब आणि इतर गंभीर आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने दिले जाते.

रोहन प्रल्हाद लोंढे (वय 29, रा. ससाणेनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून उत्तेजक द्रव्याच्या 16 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिम करणाऱ्या तरुणांना आरोपी लोंढे उत्तेजकाची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली होती. शंकरशेठ रस्त्यावर तो औषधाची विक्री करण्यासाठी येणार असल्याचे कर्मचारी रेणुसे यांना समजले.

त्यानुसार पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून ‘मेफेंटाइनरमाइन सल्फेट’ या उत्तेजकांच्या 16 बाटल्या जप्त केल्या‌ आहेत.

आरोपी लोंढेला ताब्यात घेण्यात आले. यानंतर ही माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला (एफडीए) देण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.