Pune News: पद्मगंधा प्रकाशनाचे प्रमुख अरुण जाखडे याचं आज पहाटे पुण्यात निधन

एमपीसी न्यूज: पद्मगंधा प्रकाशनाचे प्रमुख अरुण जाखडे याचं आज पहाटे पुण्यात झोपेत निधन झालं. ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांच निधन झालं ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. आज दुपारी 2 वाजता एंरडंवण्यातील पांडुरंग काॅलनी, कलमाडी हायस्कुल जवळील कार्यालयात त्यांचे पार्थीव अंतिम दर्शनासाठी आणलं जाणार आहे त्यानंतर वैकुंठ स्मशान भुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

मराठी प्रकशन विश्वतील ही दुसरी मोठी धक्कादायक घटना असल्यानं प्रकाशनविश्वासह साहित्यविश्र्वाला धक्का बसला आहे. मराठी प्रकाशक परिषदेचे ते अध्यक्ष होते. बालवाडमय, विज्ञान, इतिहास आदी विषयांवर त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांना विविध साहित्य संस्थाचे पुरस्कार मिळाले आहेत. गणेश देवी, रा.चिं.ढेरे, व.दि.कुलकर्णी अशा दिग्गज लेखक-संशोधकांचे ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली पद्मगंधा आणि आरोग्य दर्पण हे दिवाळी अंक प्रकाशित होतं असतं.

निसर्गरम्य ग्रामीण भागात त्यांच बालपण गेलं. या वातावरणाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. निसर्गातच नाही तर माणसे, श्वान, जनावरं, पशुपक्षी यांच्यातही ते रमले. त्यांच्या या अनुभवाचा फायदा त्यांना ‘इर्जिक’ या स्तंभलेखनासाठी झाला.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, पाचरुट, पावसाचे विज्ञान, प्रयोगशाळेत काम कसे करावे, भारताचा स्वातंत्र्यलढा,भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण,विश्वरूपी रबर,शोधवेडाच्या कथा आदी विपूल साहित्य त्यांनी प्रकशित केलं आहे. प्रख्यात लेखक खुशवंत सिंग यांच्या इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद पद्मगंधातर्फे प्रकाशित करण्यात आला होता. महाराष्ट्राची कुलस्वामिनी, भाग्यविधाती, सर्जक आणि संगोपक अशी श्रीतुळजाभवानीमातेच्या प्राचीन मिथकाची प्रेरकता उलगडणारा डाॅ. रा.चिं.ढेरे लिखीत श्रीतुळजाभवानी हा ग्रंथ देखील पद्मगंधातर्फे प्रकाशित करण्यात आला होता.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष आणि दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे प्रतिक्रिया

अरुण जाखडे यांचे जाणे ही फारच धक्कादायक बातमी आहे. सुनील मेहतांच्या शोकसभेला ते उपस्थित होते,त्यावेळेला असे काही होईल असे कोणालाच वाटले नसेल.दर्जेदार,वैचारिक, समीक्षात्मक पुस्तकांच्या प्रकाशनाचे एक अत्यंत अवघड काम त्यांनी पदमगंधाच्या स्थापने पासून पेलले.आठवडाभरात दुसरा मोठा जिद्दी प्रकाशक गेला ही खरोखरच प्रकाशन व्यवसायाची फार मोठी हानी आहे.माझे ते वीस वर्षांपासूनचे मित्र होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.