Pune News : पुण्यात मिटरमध्ये फेरफार करून चोरली तब्बल 3 लाख युनीट वीज

एमपीसी न्यूज – कोरेगाव पार्क येथील एका वीज ग्राहकानं (Pune News ) मीटरमध्ये फेरफार करून तब्बल 3 लाख 37 हजार 215 युनिटची वीजचोरी केल्याचे महावितरणने केलेल्या तपासणीत उघड झाले आहे.यावरून महावितरणने ग्राहकाला 1 कोटी 27 लाख 50 हजार रुपयांचे वीज बील दिले आहे.

संबंधीत वाणिज्य ग्राहकाने वीज मिटरच्या सिलसोबत छेडछाड करून मिटरमध्ये प्रत्यक्ष विजवापराची कमी नोंद होण्यासाठी रेजिस्टंन्स बसविले असल्याचे तपासणीत दिसून आले. त्यामुळे मीटरमधील वीज वापर प्रत्यक्षातील वीज वापरापेक्षा 79 टक्के कमी नोंदविला जात होता. या वीज ग्राहकास 1 कोटी 27 लाख 50 हजार रकमेचे बिल दिले आहे.

Yerwada News : दत्ता साठे व टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

सहा लाख सहा रुपयांचे तडजोड शुल्क आकारून त्यांच्याकडून हे बिल आदा करण्यात आले.पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी वीज चोरीविरुद्ध मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राबविलेल्या वीज मीटर तपासणी मोहिमेत ही चोरी उघडकीस आली.

 प्रादेशिक संचालकांनी एका परिपत्रकाद्वारे 20 किलोवॅट व त्यापेक्षा जास्त भार असलेल्या ग्राहकांच्या स्थळाचे निरीक्षण करून अहवाल सादर करण्यच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे वीज चोरीचा छडा लागत असून वीज चोरांवर कारवाई करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.