Pune News: पादचारी व्यक्तीवर प्राणघातक हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी प्रसाद आणि त्यांचा जखमी मित्र उमेश हे दोघे टिळक रोडवरून पायी चालत जात होते.

एमपीसी न्यूज – मित्रासोबत रस्त्याने पायी जात असलेल्या एका व्यक्तीवर तिघांनी मिळून प्राणघातक हल्ला केला. यामध्ये व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.4) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील टिळक रोडवर घडली.

उमेश नांगरे (वय 43, रा. सिंहगड रोड, पुणे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्रसाद धुमाळ (वय 40, रा. सदाशिव पेठ, पुणे) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी प्रसाद आणि त्यांचा जखमी मित्र उमेश हे दोघे टिळक रोडवरून पायी चालत जात होते. ते महाराष्ट्र मंडळ जवळ टिळक अपार्टमेंट समोर आले असता तीन अज्ञात हल्लेखोरांनी उमेश यांच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला.

लोखंडी रॉडने डोक्यात, हातावर आणि पायावर गंभीर दुखापत करून हल्लेखोर पळून गेले. याबाबत तीन अज्ञात हल्लेखोरांवर भारतीय दंड विधान कलम 307, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.