सोमवार, डिसेंबर 5, 2022

Pune News : कोयत्याने वार करून तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – कोयत्याने डोक्यात व हातावर वार करून तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हि घटना पुण्यातील उत्तमनगर, पायगुडे वस्ती येथे शनिवारी (दि.3) घडली. 

याप्रकरणी हल्ल्यात जखमी झालेल्या 21 वर्षीय तरुण रामेश्वर इंगळे (रा. पायगुडे वस्ती, उत्तमनगर पुणे ) याने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंगळे या तरुणाला चार अनोळखी व्यक्तींनी हातात बांबू व कोयते घेऊन हातावर व डोक्यात वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Latest news
Related news