Pune News : रिक्षाचालकाकडून शरद पवार यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा, प्रवाशांना मोफत प्रवास

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा शनिवारी 80वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या पाठिराख्यांनी यासाठी राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजनही केले होते. परंतु पुण्यातील एका रिक्षाचालकाने मात्र शरद पवार यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

संदीप शशिकांत काळे असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्यांनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी मोफत रिक्षा प्रवासाचे आयोजन केले होते.

संदीप काळे यांनी या उपक्रमासाठी आठ रिक्षा उपलब्ध करून दिल्या होत्या. या उपक्रमांतर्गत त्याने एकाही प्रवाशांकडून पैसा न घेता त्यांना इच्छित स्थळी पोहोचवण्याचे काम केले आहे. संदीपचा या अनोख्या उपक्रमाचे मात्र सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.