Pune News : शाहीर साठे वाटेगांवकर व शाहीर दादा पासलकर यांना पुरस्कार जाहीर

एमपीसीन्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा तिसरा “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार” शाहीर दीनानाथ साठे वाटेगांवकर व शाहीर दादा पासलकर यांना जाहीर करण्यात आला.

हा पुरस्कार लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुण्यतिथीनिमित्ताने जाहीर करण्यात येत आहे. रुपये पाच हजार, सन्मानचिन्ह, आहात, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी राजेश पांडे, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, प्रसेनजित फडणवीस यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण दि.1 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता विद्यापीठात करण्यात येणार आहे.

अण्णा भाऊ साठे पुरस्कार निवड समितीतील सदस्य प्राचार्य डॉ.गणेश राऊत, प्रा.डॉ.श्यामा घोणसे, प्रा. डॉ. प्रशांत साठे, प्रा. डॉ. गौतम बेंगाळे, प्रा. डॉ. तानाजी हातेकर, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर कुंभार, प्रा. डॉ. सुनील भंडगे आदींनी या पुरस्कारार्थीची निवड केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.