Pune News : प्रदूषण रोखण्यासह इंधन बचतीसाठी ‘संरक्षण क्षमता’तून जनजागृती

एमपीसी न्यूज : विनाकारण इंधन वापरल्यामुळे वाहनातून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे (Carbon emissions) हवेतील प्रदुषणासह पर्यावरणाचा समतोल ढळतो. त्यामुळे कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी इंधन बचतीचा ( save fuel) संदेश देत 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान संरक्षण क्षमता (protection potential) महिना साजरा केला जात असल्याची माहिती हिंदुस्तान पेट्रोलियमचे ( Hindustan Petroleum) वरिष्ठ प्रादेशिक विक्री व्यवस्थापक मंगेश डोंगरे ( Mahesh Dongre ) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे लष्कर येथील हिंदुस्तान पेट्रोलियम पुणे विभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा नोडल अधिकारी चित्रा नायर ( chitra nair)उपस्थित होत्या.

_MPC_DIR_MPU_II

डोंगरे म्हणाले, हवेतील कार्बनचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. इंधनाच्या प्रज्ज्वलनातून हवेचे प्रदुषण वाढते. पर्यावरण संवर्धन (Environmental conservation), इंधनाचा कमी वापर (less fuel consumption) करण्यासंदर्भात जनजागृती (Awareness) आणि प्रबोधनासाठी देशव्यापी संरक्षण क्षमता महिना(संक्षम) 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जात आहे.

यामध्ये शाळा, महाविद्यालयात इंधन संवर्धन चित्रकला स्पर्धा, पेट्रोल पंप, गॅस एजन्सीत कार्यशाळा, पथनाट्यातून जनजागर, ड्रायव्हिंग स्पर्धा, टिव्ही रेडीयोवर चर्चा असे विविध उपक्रम राज्यभरात राबविण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.