Pune News : …तर हे आंदोलन सरकारच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही : बाबा आढाव

एमपीसी न्यूज : आम्ही आणीबाणीचा अनुभव घेतला आहे. सरकारच्या डोक्यात आणीबाणी सदृश भय लादण्याचा प्रयत्न करू, असे वाटत  असेल तर हे सरकारच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर दिला.

त्यामुळे देशात वेगळेच वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हा धोक्याचा इशारा असेल हे सरकारने लक्षात ठेवावे, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

यावेळी बाबा आढाव पुढे म्हणाले, मी 70 वर्ष चळवळीमध्ये असून सरकार साधे बोलण्यास तयार नाही. यामुळे आमच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहे, हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता सरकारची आहे. दोष केवळ जुन्या कायद्यांचा आहे का त्या कायद्याच्या अपुरेपणाचा आणि तुमच्या नाकर्तेपणाचा आहे.

देशभरात अनेक तज्ञ मंडळी आहे. मात्र, त्यांच्यासोबत आजवर कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. दिल्लीमध्ये बोलावा ना, आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.