Pune News : फुगे विक्रेत्या महिलेची तीन मुले बेपत्ता

एमपीसी न्यूज –  जंगली महाराज रस्त्यावर एका फुगे विक्रेत्या महिलेची तीन मुले ( Pune News ) अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली . याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Today’s Horoscope 05 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

याप्रकरणी आयना शंकर काळे (वय 35) हिने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  तिची जनाबाई (वय 10), दत्तू (वय 7), आरती (वय 5) ही तीन मुले फुगे विक्री करुन आईला मदत करतात. मुले बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.प्राथमिक चौकशीत आयना मुलांना दोन दिवसांपूर्वी ओरडली होती. आई रागावल्याने मुले बेपत्ता झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांकडून काळे आणि तिच्या नातेवाईकांची चौकशी करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव तपास (  Pune News ) करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.