Pune News : चाकणहून शिक्रापूरकडे जाणाऱ्या तिन्ही मार्गावर एक जानेवारीला प्रवेशबंदी – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

एमपीसी न्यूज – पेरणे येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चाकण परिसरातील हद्दीतून शिक्रापुरकडे जाणाऱ्या तीन मार्गावरील वाहतूक 1 जानेवारी 2021 रोजी रात्री पासून रात्री बारा वाजेपर्यत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. दरम्यान, शिक्रापूरकडे जाणाऱ्या तिन्ही मार्गावर प्रवेशबंदी घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

पुणे ग्रामीणमधील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हवेली तालुक्यातील पेरणे येथे 1 जानेवारी 2021 रोजी जयस्तंभ कार्यक्रमाच्या अनुषांगाने 31 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2021 रात्री बारा वाजेपर्यंत जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यातून व परराज्यातून नागरीक येत असतात.

महाराष्ट्र शासन, गृहविभाग यांच्याकडील परिपत्रकान्वये सदर अभिवादनाचा कार्यक्रम कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक स्वरुपात व साध्या पध्दतीने साजरा करण्याबाबत मार्गदर्शन सूचना देण्यात आलेल्या आहेत.

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरीता पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्राच्या हद्दीतून शिक्रापुरकडे जाणा-या तीन मार्गावरील वाहतूक 1 जानेवारी 2021 रोजीच्या रात्री बारा पासून ते रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

खाजगी व सार्वजनिक वाहतूकीच्या मार्गामध्ये बदल करण्याबाबत अधिसूचना काढण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

वाहतूक बंद करण्यात येणारे मार्ग-

# चाकण, तळेगांव चौक – शेल पिंपळगांव – बहुळ – साबळेवाडी अशी दोन्ही बाजुकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील

# आळंदी – शेलपिंपळगाव – बहुळ – साबळेवाडी अशी दोन्ही बाजुकडील येणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद राहील

# आळंदी – मरकळ – कोयाळी – शेलपिंपळगाव – बहुळ – साबळेवाडी दोन्ही बाजुकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.