Pune News : बाणेर कोविड रुग्णालय सोमवारपासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित : महापौर

0

एमपीसी न्यूज – महापालिकेने साकारलेले बाणेर डेडीकेटेड कोविड रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले जात आहे. सोमवारपासून सर्वच्या सर्व म्हणजे 314  बेड्स उपचारांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यात २७२ ऑक्सिजन तर 42 आयसीयू बेड्स असणार आहेत’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज, बुधवारी दिली.

बाणेर येथील पुणे महापालिकेच्या डेडीकेटेड कोविड रुग्णालयाला महापौर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन आढावा बैठक घेतली.

रुग्णांना देण्यात येणारे उपचार, जेवण, औषधे आणि इतर व्यवस्थांची माहितीही महापौरांनी घेतली. सर्व व्यवस्थांबाबत रुग्ण आणि नातेवाईक समाधानी आहेत. महापौर मोहोळ यांनी विविध सूचनाही यावेळी प्रशासनाला दिल्या.

यावेळी आयुक्त विक्रम कुमार, नगसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, गणेश कळमकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, उपायुक्त नितीन उदास, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांच्यासह रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि महापालिकेचे विविध अधिकारी समवेत होते.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘बाणेर रुग्णालयासाठी एकूण 26  व्हेंटिलेटर उपलब्ध झाले असून त्यापैकी 15  कार्यान्वित झाले आहेत. येत्या दोन दिवसांत आणखी एक व्हेंटिलेटर उपलब्ध होईल. महापालिकेच्या 202-255002110 या क्रमांकावर नोंदणी करणाऱ्या रुग्णांना या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले जात आहे.

_PDL_ART_BTF

सद्यस्थितीत या ठिकाणी 56  डॉक्टर्स, 57  नर्स आणि 51 मदतनीस उपलब्ध आहेत. आजपर्यंत या रुग्णालयात 105 रुग्ण दाखल झाले असून सद्यस्थितीत 8 रुग्ण आयसीयूमध्ये तर 70 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत’.

‘जम्बो’प्रमाणे ‘रुग्णांच्या उपचारासाठी सेंट्रलाईझ पद्धतीने मॉनिटरिंग सिस्टीम या रुग्णालयातही बसवण्याच्या सूचना दिल्या असून याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासही सांगितले आहे.

शिवाय नातेवाईकांना रुग्णांशी संवाद साधता यावा, या साठी नातेवाईक कक्षात रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरसिंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा सूचनाही तातडीने दिल्या आहेत’, असेही महापौर म्हणाले.

16 कोरोनाबाधित बरे होऊन घरी

बाणेरच्या रुग्णालयातून आजवर 16  कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. या केंद्रावर उत्तम उपचार आणि सुविधा उपलब्ध असल्याचे डिस्चार्ज रुग्ण सांगत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.