Pune News : राहण्यायोग्य शहरांमध्ये बेंगलोर अव्वल, पुणे दुसऱ्या तर पिंपरी चिंचवड सोळाव्या क्रमांकावर

एमपीसी न्यूज – केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने ईज ऑफ लिविंग इंडेक्स रैंकिंग 2020 ची यादी जाहीर केली. त्यात राहण्यायोग्य शहरांमध्ये बेंगलोर शहर अव्वल असून पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर या यादीत पिंपरी-चिंचवड शहर 16 व्या स्थानी आहे.

भारतातील 111 शहरांचे विविध निकषांवर आधारित एक सर्वेक्षण करण्यात आले. शैक्षणिक विकास, आरोग्य सोयी सुविधा, राहण्यासाठी कितपत योग्य, आर्थिक विकासाचा स्तर, वाहतूक व्यवस्था, पर्यावरण, रोजगाराची संधी, हरित क्षेत्र, इमारती, प्रदूषण यांसारखे निकष लावण्यात आले होते. देशातील 111 शहरातील 32 लाख 20 हजार नागरिकांनी त्यांचे मत नोंदवले आहे.

_MPC_DIR_MPU_II

राहण्यायोग्य शहरांच्या यादीत बेंगलोर शहराने 66.70 गुणांसह पहिला क्रमांक मिळवला. पुणे शहराला 66.27 गुण मिळाले. राहण्यायोग्य शहरांमध्ये पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील पुणे (दुसरा), नवी मुंबई (सहावा), मुंबई (दहावा) ही तीन शहरे आहेत. तर या यादीत पिंपरी-चिंचवड 16 व्या स्थानी आहे.

म्युनिसिपल परफॉर्मन्समध्ये मात्र पिंपरी-चिंचवड शहराने पुणे शहराला मागे टाकले आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर इंदोर, दुसऱ्या क्रमांकावर सुरत, तिसऱ्या क्रमांकावर भोपाळ आणि चौथ्या क्रमांकावर पिंपरी-चिंचवड शहर आहे. तर पुणे शहर पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्राची पिंपरी-चिंचवड (चौथा), पुणे (पाचवा), मुंबई (आठवा) ही तीन शहरे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.