Pune News : कोरोना लसीकरणाचा फायदा ! पालिका कर्मचारी बाधित होण्याच्या प्रमाणात घट

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिका भवन कोरोनाचे हॉट स्पॉट बनले होते. मोठ्या प्रमाणात पालिका कर्मचारी कोरोना बाधित झाले होते. तब्बल 668 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती तर तब्बल 50 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या दोन महिन्यांत फक्त एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून पहिल्या लाटेपेक्षा अधिक लोक बाधित होत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा आकडा पन्नास हजारांच्या पुढे गेला होता, त्यामुळे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांची जवळपास 18 हजार जणांची यंत्रणा आता कोरोनासंबंधीच्या उपाययोजनांच्या कामात आहेत. त्यात प्रामुख्याने कोविड केअर सेंटर चाचण्यांची केंद्रे, हॉस्पिटल हि ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणी कोरोना होण्याच्या अधिक संभावना असते.

_MPC_DIR_MPU_II

त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल 668 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात 553 कायमस्वरूपी तर 115 कंत्राटी कर्मचारी होते, तर तब्बल 50 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यात 4515 कंत्राटी कर्मचारी होते. आता दुसऱ्या लाटेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे.

16 जानेवारीपासून कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. त्यात फ्रंटलाइन वर्कर म्हणून पालिका कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा पहिला आणि दुसरा डोस घेऊन झाला आहे. परिणामी आता दुसऱ्या लाटेत कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.