Pune News : जंबो कोविड हॉस्पिटलच्या गलथान कारभाराविरोधात ‘भाजयुमो’चा धडक मोर्चा

यावेळी युवा मोर्चाच्यावतीने महाविकास आघाडी सरकार व PMRDAच्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला.

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील जंबो कोविड हॉस्पिटलच्या गलथान कारभारा विरोधात बुधवारी ( दि. 8 ) दुपारी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे धडक मोर्चा काढण्यात आला.

भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक व युवा मोर्चा अध्यक्ष नगरसेवक दीपक पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा मोर्चाच्यावतीने महाविकास आघाडी सरकार व PMRDAच्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला.

लाईफ लाईन संस्थेवर दंडात्मक कारवाई करावी, जम्बो कोविड रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना नुकसान भरपाई म्हणून एक कोटी रुपये द्यावे, जम्बो रुग्णालयाच्या दुरव्यवस्थेला जवाबदार असलेल्या अधिकाऱ्याचा राजीनामा घ्यावा, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.

युवा मोर्चा सरचिटणीस निहाल घोडके, संपर्क प्रमुख प्रतिक देसरडा, कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष दुषत मोहोळ, शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष अपूर्व खाडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

खासदार गिरीश बापट यांनीही या हॉस्पिटलची पाहणी करून नाराजी व्यक्त केली होती. सध्या पुणे महापालिकेतर्फे या जंबो कोविड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्सेस व इतर स्टाफ नियुक्त करण्यात आला आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही मंगळवारी स्वतः पीपीई किट घालून या हॉस्पिटलची पाहणी करून रुग्णांची विचारपूस केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.