Pune News : पांडुरंग रायकर मृत्यूप्रकरणी भीम छावाचे आक्रोश आंदोलन 

एमपीसी न्यूज – पत्रकार पांडुरंग रायकर यांचा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नुकताच मृत्य झाला आहे. त्यामुळे या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आणि दोषीवर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी भीम छावाचे प्रदेशाध्यक्ष श्याम गायकवाड यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त करून तीव्र आंदोलन केले. 

या वेळी प्रशासनाच्या विरोधी घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात पुणे शहरातील युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्युला जबाबदार असणा-या अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हे दाखल झाले पाहिजे, पत्रकार पांडूरंग रायकर यांच्या परिवारातील सदस्यांना शासकीय नोकरी मिळाली पाहिजे,

शासनाने जाहिर केलेल्या कोरोना योध्दांना जी मदत आहे ती रायकर परिवाराला त्वरित मिळाली पाहिजे, प्रत्येक पत्रकारांनसाठी कोविड हाॅस्पिटलमध्ये राखीव बेड मिळालाच पाहिजे, प्रत्येक कोविड हाॅस्पिटलच्या विश्रांती गृहामध्ये सी.सी.टी.व्ही सिक्रन लावलीच पाहिजे, या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे  देण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  शामभाऊ गायकवाड ,दलीत कोब्राचे भाई विवेक चव्हाण, निलेश गायकवाड मंगेश कांबळे विशाल कांबळे अनिकेत साखरे ,पुणे शहर अध्यक्ष अमित मोरे, चंद्रकात सोनकांबळे, ज्ञानेश्वर गायकवाड नितिन आहिरे सचिन गायकवाड प्रतिक कांबळे  यासह असंख्य कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.