Pune News : हडपसर येथील जीवदान मिळालेल्या  वडाच्या झाडाचा  साताऱ्यात वाढदिवस  साजरा 

एमपीसी न्यूज – पुनर्रोपण द्वारे साताऱ्यात जीवदान  मिळालेल्या हडपसरच्या वडाचा गुरुवारी (दि.26) म्हणजे प्रजासत्ताक दिनी  पहिला वाढदिवस  साताऱ्यातील म्हसवे येथे थाटात (Pune News )साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय वृक्ष म्हणून वडाला अभिनेते सयाजी शिंदे ,’सह्याद्री देवराई’ संस्थेचे कार्यकर्ते ,पोलीस अधीक्षक यांनी अनोखी मानवंदना दिली.’सह्याद्री देवराई’ आणि सातारा पोलीस निर्मित, संचलित सातारा बायोडायव्हर्सिटी पार्क ,म्हसवे येथे प्रजासत्ताक दिनी दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम झाला. या अनोख्या सोहळ्यात सातारा व परिसरातील निसर्गप्रेमी नागरिक उपस्थित होते.

 

Pune News : हडपसर येथील जीवदान मिळालेल्या  वडाच्या झाडाचा  साताऱ्यात वाढदिवस  साजरा 

सयाजी शिंदे,त्यांचे कुटुंबीय,लेखक अरविंद जगताप,सातारा पोलीस अधीक्षक  समीर शेख,सुहास वैंगणकर,विजय निंबाळकर,अलका शिंदे,अभय फडतरे,अनिकेत रणपिसे,सिद्धू शिंदे,गजानन भोसले,तुषार सावंत,पिंटू जगदाळे उपस्थित होते.चिंचणेर निंब गावच्या लेझीम पथकाने  विविध खेळ सादर केले.नृत्य करण्यात आले.

सुमारे शंभर वर्ष वयाच्या, पण मालकाला नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपण द्वारे  जीवदान देण्यात  ‘सह्याद्री देवराई ‘ संस्थेला यश  एक वर्षांपूर्वी यश आले  ! वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन रहावे म्हणून  प्रजासत्ताकदिनी या राष्ट्रीय वृक्षाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. .

 सहयाद्री देवराई संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे म्हणाले, ‘ अडचण होत आहे असे समजून वड कापायला निघालेल्या हडपसरच्या एका व्यक्तीकडून आम्ही शंभर वर्ष वयाचा हा वटवृक्ष शास्रोक्त पद्धतीने पुनर्रोपणासाठी हलवला. लांब ट्रकमधून साताऱ्याला गोळीबार मैदान,म्हसवे येथे नेवून  पुनर्रोपण केले. त्याला जीवदान (Pune News ) मिळून पालवी फुटली आहे.वाढ होत आहे. सर्व वृक्षप्रेमी नागरिक, वारकरी, विद्यार्थी मिळून  पालवी फुटलेल्या वटवृक्षा भोवती जमले त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

रस्त्यांच्या कामात कापले जाणारे वृक्ष अशा पध्दतीने वाचवले पाहिजेत. सरकारने ही पुढाकार घेतला पाहिजे. अडचण होते, म्हणून  ही झाडं काढून टाकून देता कामा नये. हा तर राष्ट्रीय वृक्ष आहे , म्हणून त्याचे सन्मानाने 26 जानेवारी 2022 रोजी म्हसवे ( सातारा ) येथे पुनर्रोपण करण्यात आले’आणि पहिला वाढदिवसही साजरा करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.