Pune News : चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान रानगव्याचा मृत्यू !

एमपीसी न्यूज : शहरातील कोथरूड येथील महात्मा सोसायटीत पहाटे पाचच्या सुमारास रानगवा दिसल्याचे तेथील रहिवाशांच्या निदर्शनास आले. अत्यंत दाट लोकवस्तीत रानटी प्राणी आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

परंतु वन विभाग, अग्निशमन दलासह पोलीस प्रशासनाच्या चार तास शर्थीच्या प्रयत्नातून रेस्क्यू ऑपरेशन राबवत बेशुद्ध करून ताब्यात घेत असताना रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोथरुडच्या इंदिरा नगर परिसरात रानगवा बेशुद्ध पडल्यानंतर त्याचे चारही पाय बांधून ताब्यात घेऊन ट्रकमध्ये नेत असताना गव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना महात्मा सोसायटीत गवा हा रानटी प्राणी दिसल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आम्ही तातडीने पोलिसांसह अग्निशमन विभागाला कळविले. वन विभागाचे पथक एका तासात घटनास्थळी पोहोचले, असे सोसायटीचे अध्यक्ष महेश गोळे यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

MPC News Exclusive : 20 वर्षांपूर्वी पुण्यात आढळला होता रानगवा; जंगलात सुखरूप झाली होती रवानगी!

तो शेजारीच असणाऱ्या एनडीएच्या जंगलातून आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. गव्याचे वय सुमारे चार वर्षे असून त्याचे वजन अंदाजे 800 किलो असेल, असा अंदाज आहे. दरम्यान रानगवा रस्ता चुकल्यामुळे बिथरला, बघ्यांची गर्दी वाढल्यामुळे तो सैरावैरा धावू लागला. मात्र गवा बिथरल्याने तेथील बंगल्यांच्या भिंतींना धडका देत होता. त्यामुळे नाक, तोंडाजवळ जखम झाल्यामुळे रक्त वाहत होते. गळ्यात फास बसल्यामुळे गव्याला दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली जात होती.

सकाळी साडे नऊच्या सुमारास पोलीस, वन विभाग कर्मचारी आणि अग्निशामक दल दाखल झाले. मदत कार्य रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. यामध्ये तीनवेळा डार्ट इंजेक्शन दिल्यानंतर तो इंदिरानगर परिसरात बेशुद्ध पडला. दरम्यान त्याच्या गळ्यात फास लावून पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळे गळफास बसला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघ्यांच्या प्रचंड गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिस प्रशासन मात्र अपयशी ठरल्याचे दिसून आले.

Pune News : पुण्याच्या कोथरूड परिसरात अवतरला भलामोठा गवा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.