Pune Bison News : गव्याला बेशुद्ध न करता नैसर्गिक अधिवासात पाठवणार : वनसंरक्षक राहुल पाटील

एमपीसी न्यूज : वनविभागाकडून शक्यतो रानगव्याला बेशुद्ध न करता पुन्हा जंगलाच्या नैसर्गिक अधिवासात पाठवणार आहोत, अशी माहिती पुण्याचे वनसंरक्षक राहुल पाटील यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

पाषाण तलावासमोरील एचईएमआरएलच्या संरक्षित भिंतीच्या पलीकडील जंगलात गव्यांचं कॉरिडॉर आहे. पश्चिम घाटाच्या डोंगंररांगाचा हा भाग असल्यामुळे याठिकाणी गव्यांचे वास्तव्य असते.

सध्या हा गवा शांत आहे, त्यामुळे त्याला बेशुद्ध न करता पुन्हा जंगलात त्याच्या नैसर्गिक अधिवासात माघारी पाठवण्यावर आमचा भर राहणार आहे. नागरीकांसह पोलिस, अग्निशमन प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे. योग्य वेळी आम्ही रेस्क्यू ऑपरेशनची माहिती दिली जाईल, असेही वनसंरक्षक पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.