Pune News : अँमिनिटी स्पेस भाडेतत्वार देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र

एमपीसी न्यूज – अँमिनिटी स्पेस 90 वर्षांसाठी भाडेतत्वार देण्यास भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मने जुळली आहेत. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा सूचना ऐकल्यामुळे आता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर करताना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. भाजपने आमच्या सूचना मान्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रस्तावाच्या बाजूने मतदान करतील, असे खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शहरातील 270 मोक्याच्या सुविधा क्षेत्राच्या जागा आहेत. यामध्ये 85 जागा या विविध आरक्षणे असणार्‍या असून 185 जागांवर कोणतेच आरक्षण नाही. या जागा तीस-तीस वर्षांच्या अनुक्रमने 90 वर्षांसाठी भाडेकराराने देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी प्रस्तावाला विरोध केला होता. याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी माजी पदाधिकार्‍यांना निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय झाला आहे. अ‍ॅमिनिटी स्पेसबाबात आराखडा तयार करुन 33 टक्के जागा झाडे लावण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. प्रस्ताव मंजुरीच्यावेळी भाजपकडून अशी उपसूचना देण्यात येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस प्रस्तावाला पाठिंबा देण्यास असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी याबाबत पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.