22.2 C
Pune
शनिवार, ऑगस्ट 13, 2022

Pune News: मोदी सरकारच्या कृषी कायद्याला स्थगिती देणाऱ्या राज्यशासनाच्या आदेशाची भाजपने केली होळी

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – मोदी सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या अंमलबजावणीस नकार देत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या स्थगिती आदेशाची पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली. 

शेतकऱ्यांच्या जीवनात नवी पहाट आणणारा हा कायदा ताबडतोब महाराष्ट्रात लागू करावा, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पोकळे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, जिल्हा भाजपाचे सर्व उपाध्यक्ष, सर्व सरचिटणीस, सर्व सचिव, मोर्चा अध्यक्ष, विविध आघाड्यांचे संयोजक उपस्थित होते.

spot_img
Latest news
Related news