Pune News : भाजप सहकार आघाडी पुणे शहर कार्यकारिणी जाहीर

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्ष सहकार आघाडीची पुणे शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी (दि.9) भाजप शहर कार्यालयात शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सहकार आघाडी पुणे शहराध्यक्ष सचिन दांगट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

सहकार आघाडीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी गिरीश घोरपडे, निळकंठ शेळके, दिलीप पर्वतीकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. सरचिटणीस पदावर दीपक दुधाणे, अजित देशपांडे, डॅा. धनंजय जोशी, चिटणीसपदी माया गायकवाड, बरखा लाहोटी, बिपीन रोठे तसेच कोषाध्यक्षपदी सुभाष आगरवाल यांच्यासह 31 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याप्रसंगी पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, सरचिटणीस गणेश घोष, नगरसेवक दीपक पोटे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्यासह सहकार आघाडीचे नवनियुक्त पदाधिकारी आणि मित्र परिवार उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.