_MPC_DIR_MPU_III

Pune News : भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांना ‘आदर्श कार्यक्षम नगरसेवक’पुरस्कार !

एमपीसीन्यूज : दैनिक नवभारत वृत्तपत्र समुहाच्या मराठी दैनिक नवराष्ट्रच्या वतीने “आदर्श कार्यक्षम नगरसेवक” हा पुरस्कार यंदा पिंपरी चिंचवड़ महापालिकेचे भाजपचे युवा नगरसेवक संदीप वाघेरे यांना प्रदान करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

दैनिक नवराष्ट्रच्या पुणे आवृत्तिच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी पुण्यातील एस.एम.जोशी सभागृह येथे ‘आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला.

या वेळी नगरसेवक संदीप वाघेरे यांना राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक आणि युवराज ढमाले कॉर्पोरेशनचे प्रमुख युवराज ढमाले, नवभारत समुहाचे अध्यक्ष श्रीनिवास राव, पिंपरी चिंचवड़चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश इत्यादि मान्यवरांच्या हस्ते ‘आदर्श कार्यक्षम नगरसेवक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.