_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune News : रमजान ईदसाठी भाजपच्यावतीने मुस्लिम बांधवांना शिधा वाटप

एमपीसीन्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. रोजचा दिवस कसा भागवायचा याची चिंता अनेक मुस्लिम कुटुंबीयांना जाणवत होती. मुस्लिम बांधवांची रमजान ईद गोड व्हावी, यासाठी पुणे महापालिका सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या वतीने नागरिकांना आवश्यक असलेल्या किटचे वाटप करण्यात आले.

खासदार गिरीश बापट आणि आमदार सुनील कांबळे यांच्या उपस्थितीत या किटचे वाटप करण्यात आले. प्रभाग क्रमांक 16, सोमवार पेठ, रास्ता पेठ मधील मुस्लिम बांधवांना हे साहित्य देण्यात आले. कोरोनाच्या काळात देखील मुस्लिम बांधवांना ईदचा सण साजरा करता यावा, या भावनेतून एक कर्तव्य म्हणून हे किट भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आल्याची भावना सभागृह नेते बिडकर यांनी व्यक्त केली.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या वतीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. करोनाबाधिताना आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पालिका कटिबद्ध असून अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण कसे करता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. अशा काळात सभागृह नेते बिडकर यांनी पुढाकार घेत मुस्लिम बांधवांना दिलेली भेट कौतुकास्पद आहे, अशी भावना आमदार कांबळे यांनी व्यक्त केली.

नागरिकांना औषधे उपलब्ध करून देण्याचा विषय असो अथवा खासगी रुग्णालयाने उपचारांसाठी आकारलेले वाढीव शुल्क कमी करण्याचा विषय असो सभागृह नेते बिडकर यांनी प्रत्येक गोष्टीत पाठपुरावा करत या भागातील नागरिकांना न्याय मिळवून दिल्याने कांबळे यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.