Pune News: मांजरीतील भाजप पदाधिकारी अ‍ॅड. शैलेश म्हस्के यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या मांजरीतील भाजप पदाधिकारी अ‍ॅड. शैलेश म्हस्के यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. म्हस्के यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

पुणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे. पुणे महापालिका हद्दीलगतची गावे महापालिकेत समाविष्ट केली आहेत. कार्यकर्त्यांचे मोठे संघटन असलेले मांजरीतील भाजप पदाधिकारी अ‍ॅड. शैलेश म्हस्के यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी मनगटावर घड्याळ बांधले.

सत्ताधारी भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. म्हस्के यांच्या प्रवेशाचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या गळाला मोठा मासा लागला आहे. निवडणुकीत त्याचा फायदा पक्षाला होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.