Pune News : राहुल गांधींना चार वर्ष शिक्षेच्या मागणीसाठी पुण्यात भाजपचे आंदोलन

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी (Pune News) यांनी केलेल्या विधानाबाबत न्यायालयाने दोन वर्षाची सुनावली.त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात भाजपकडून राहुल गांधीचा निषेध नोंदविण्यासाठी आणि न्यायालयाने चार वर्षाची शिक्षा सुनावली पाहिजे,या मागणीसाठी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

 

काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकच्या कोलार येथे आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे ? असा प्रश्न त्यांनी विचारला होता.या विरोधात गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार तथा माजी मंत्री पुरनेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्या प्रकरणी न्यायालयाने राहुल गांधी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.त्या निर्णयानंतर काल देशभरात काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करित आहे.त्याच दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काल आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली होती.

 

 

Chinchwad News : श्री स्वामी समर्थ प्रकटदिन संपन्न

 

त्यानंतर आज गुडलक चौकात भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या विधानाच्या निषेधार्थ तसेच राहुल गांधींना चार वर्षाची शिक्षा झाली पाहिजे.या मागण साठी आंदोलन करण्यात आले.तसेच यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली.

 

यावेळी जगदीश मुळीक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसचे पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी बेताल विधान केले.त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने राहुल गांधीना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान स्वा.सावरकर यांच्या बद्दल देखील विधान केले होते.हे दोन्ही विधान लक्षात घेता,न्यायालयाने चार वर्षाची शिक्षा दिली पाहिजे.जेणेकरून देशाच नेतृत्व करणारे आणि देशाच्या स्वातंत्र्यामध्ये बलिदान देणार्‍या व्यक्ती बाबत अशा प्रकाराचे पुन्हा विधान करण्याची हिम्मत होणार नाही.त्यामुळे राहुल गांधी यांनी बेताल वक्तव्य करण्यापेक्षा संपलेल्या काँग्रेस पक्षासाठी काम करावे अशा शब्दात राहुल (Pune News) गांधी यांना त्यांनी टोला लगावला.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.