Pune News : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोथरूड मधील विकासकामांचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – कोथरूड मधील विकासकामांना गती मिळाली असून, आज भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यामध्ये प्रभाग क्रमांक 13 मधील म्हाडा कॉलनी मध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम, प्रभाग क्रमांक 13  अ मध्ये अनुरेखा सोसायटीत पावसाळी लाईन टाकण्याचे काम, प्रभाग क्रमांक 10 मधील श्रीकृष्ण नगर ते शास्त्रीनगर स्मशानभूमी नाल्याला सिमाभिंत बांधणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आ. चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मधील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा धडाका लावला असून, नुकताच त्यापैकी सागर कॉलनी येथील डी.पी. रोडवरील अतिक्रमण हटविले. त्यानंतर मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लावण्याचे काम हाती घेतले आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यामध्येच आज प्रभाग क्रमांक 13 मधील म्हाडा कॉलनीमध्ये आपल्या आमदार निधीतून ड्रेनेज लाईन टाकण्याचे कामाचा शुभारंभ केला. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 13 अ मध्ये पुणे शहर भाजप सरचिटणीस आणि नगरसेवक दीपक पोटे यांच्या पुढाकारातून अनुरेखा सोसायटीत पावसाळी लाईन टाकण्याचे कामाचे भूमिपूजन केले.

यावेळी कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी, नगरसेविका आणि शिक्षण समिती अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेवक जयंत भावे, मिताली सावळेकर, प्रशांत हरसुले, हर्षदा फरांदे, अनुराधा एडके, राजेंद्र येडे, राज तांबोळी, दीपक पवार, कुलदीप सावळेकर, प्राची बगाटे, अपर्णा लोणारे, शंतनु खिलारे, संगिता आदवडे, संगिता शेवडे, जयश्री तलेसरा, अर्चना लोटकरे, रमा डांगे, सुलभा जगताप, माणिक दीक्षित आदी उपस्थित होते.

त्यासोबतच गेल्या पावसाळ्यात प्रभाग क्रमांक 10 मधील श्रीकृष्ण नगर ते शास्त्रीनगर स्मशानभूमी नाल्याचे पाणी इथल्या घराघरांत शिरून मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे याचा पाठपुरावा करून महापौर विकास निधीतून सिमाभिंत बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, स्थानिक नगरसेविका अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे-पाठक, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस गणेश वरपे, बाळासाहेब टेमकर यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.