Pune News : आत्ता उठाबशा काढत असले तरी भाजपाचा पराभव होणार- जयंत पाटील

एमपीसी न्यूज : ज्यांचा पराभव होणार ते आधीच तयारी करत आहेत. देवेंद्र फडणवीस आत्ता उठाबशा काढत असले तरी त्यांना माहित झालं आहे की भाजपाचा पराभव होणार आहे. म्हणून ते आता तयारी करतायत, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने पुणे पदवीधर मतदरसंघाच्या संयुक्त प्रचाराचा नारळ आज शुक्रवारी फोडण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे सतेज पाटील, विश्वजीत कदम, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खा.अमोल कोल्हे यांच्यासह तिन्ही पक्षांचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जयंत पाटील म्हणाले, आमच्याकडे सगळी जबाबदारी दिली आहे. संयुक्त प्रचार कसा करायचा याचा आज निर्णय झाला.

उद्या 10  वाजल्यापासून प्रत्येक ठिकाणी सर्व नेते बैठका घेणार आहेत. तिन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी प्रचार करतील. आजपासून संयुक्त प्रचार सुरू करत आहोत. आमचे पाचही उमेदवार बहुमतांनी निवडून येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.