Pune News : पदवीधर मतदारसंघात भाजपचाच विजय होईल : प्रवीण दरेकर

एमपीसी न्यूज : पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघातूनही तिकिट न मिळाल्याने पुण्यातील इच्छुक महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, राजेश पांडे नाराज नाहीत. कुलकर्णीही नाराज नाहीत, त्यांची काळजी भाजप घेईल. पदवीधर मतदारसंघात भाजपचाच विजय होईल,” असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.

आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषेदेत बोलताना दरेकर म्हणाले, भाजपने केलेली कामे आणि पक्षाची भविष्यातील धोरणे पाहता या पक्षावर पदवीधरांचा विश्वास आहे. त्यामुळे संग्राम देशमुख यांना मतदारांची पसंती मिळेल, असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

_MPC_DIR_MPU_II

सध्या कॉलेज बंद आहेत, परीक्षा नाहीत, अभ्यासिका बंद आहेत, त्यामुळे सरकारचे धोरण कळत नाही. या मतदारांत चीड आहे.
भाजपचे देशमुख निवडून आल्यास पदवीधरांना नोकरी मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू. या घटकाला उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन देऊ” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

संजय राऊत यांचा आत्मविश्वास गमावला

तसेच खासदार संजय राऊत यांचा आत्मविश्वास गमावला आहे. त्यांच्या बोलण्यात पूर्वीइतका विश्वास दिसत नाही. मुंबईकर ठरवतील सत्तेचा झेंडा कोणाकडे द्यायाचा? त्यामुळे मुंबई महापालिकेवर आमचाच भगवा असेल, याचे कोणाकडे पेटंट नाही, अशी टिकाही त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.