Pune News : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजप युवा मोर्चाकडून तक्रार अर्ज दाखल

एमपीसी न्यूज : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोडवर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी वानवडी पोलीस ठाण्याबाहेर भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी लेखी तक्रार अर्ज दिला. मात्र या आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी मास्क घातले नव्हते. तर सोशल डिस्टंन्सिंगचे पालनही केले नव्हते. यामुळे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम केले आहे.

दरम्यान आज भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर वानवडी पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन संजय राठोड यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. मात्र पोलीस आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने, चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर काही वेळात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वानवडी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

यावेळी राघवेंद्र मानकर म्हणाले, राठोड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जोवर कारवाई होत नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच आम्ही आंदोलनात नियमांचे उल्लंघन केले असेल तर आम्हाला चालेल, पण आम्हाला काही करून त्या युवतीला न्याय द्यायचा असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.