Pune News : पेट्रोल दरवाढीवरून लक्ष हटविण्यासाठी भाजपचे वीजबिलावर आंदोलन : उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज : राज्यात भाजप वीज बिलावरून विनाकारण आंदोलन करीत आहे. भाजपकडून गैरसमज निर्माण करण्याचे काम चालू आहे. जेवढं व्याज आणि दंड माफ करत 50 टक्के वीज बिल माफ केलेले आहे. यासाठी निधी देखील बाजूला काढलेला आहे. पण हे कशासाठी आंदोलन करीत आहे हेच माहित नाही. पण आमचे देखील लोक पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन करत असल्याने तेथून लक्ष विचलित करण्यासाठी तरी हे भाजप करीत नसेल ना, अशी शंका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

वडगाव बुद्रुक येथे एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांंशी संवाद साधताना पवार म्हणाले, पटोले यांच्या राजीनाम्या बाबत तुम्हाला एक सांगू का कोणी एखाद्याने राजीनामा दिला की अशा बातम्या सोडता की बस, परंतु जे काही कॉमन मिनीमम प्रॉग्राम डोळ्यासमोर ठेवून आमच्या तीन ही नेत्यांनी जे ठरवलेले आहे. त्याच गोष्टी तिथे होत राहणार, तसेच त्यामध्ये जो काही बदल करायचा झाल्यास त्या तिघांना अधिकार आहे. त्या तिघांनी मिळून हे सरकार स्थापन केले आहे. तसेच आमच्या कानावर अद्याप तरी कोणतीही चर्चा नाही. पण रात्री बातम्या पाहत राजीनाम्या वरून वेगळया चर्चेवरून मुख्यमंत्री नाराज उपमुख्यमंत्री नाराज काय नाराज असायचे कारण आहे. जी काही पदे ज्या पक्षांना दिली आहेत.

ज्यावेळी ठरले तेव्हा मुख्यमंत्री शिवसेनाचा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबच असले पाहिजे अस ठरले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्विकारली. अशा घडामोडी घडल्या आहेत. पण मला एक वाटत होते की अधिवेशन तोंडावर आले असताना. अधिवेशन संपल्यावर राजीनामा दिला असता तर अधिक बर झाल असते, असे मत त्यांनी व्यक्त केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.