-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News: आंबेगाव तालुक्यातील आदिवासी विभाग शाळेला भाजपचा ‘एक हात मदतीचा’

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – तळागाळातील सर्वांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत. यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक माणसाचे समाजाच्या जडणघडणमध्ये मोठे योगदान आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

आंबेगाव तालुक्यातील पोखरी या दुर्गम भागातील श्री. पंढरीनाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने बांधकाम साहित्य भेट देण्यात आले. यावेळी आमदार लांडगे बोलत होते.

यावेळी पंढरीनाथ विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कोळप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य पश्चिम महाराष्ट्र हेमंत हरहरे, पिंपरी-चिंचवड भाजप संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, स्वीकृत नगरसेवक गोपीकृष्ण धावडे, सरपंच नंदा कोळप, प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे, सचिव आंबेकर गुरुजी आदी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, श्री पंढरीनाथ विद्या विकास मंडळाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांच्या लग्नासाठी ठेवलेल्या ठेवी मोडून महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी दिला. हे संस्कार या विद्यामंदिरात घडले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे या मातीशी आणि शाळेशी एक आत्मीयतेचे नाते आहे. हेच संस्कार या महाविद्यालयात शिकलेल्या विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतील. आंबेगाव तालुक्याच्या खाली डिंबे धरण आहे. या धरणाचे पाणी आंबेगाव तालुक्यातील वरच्या गावांना मिळावे. यासाठी 1972 सालापासून याबाबत पाठपुरावा सुरु होता.

मात्र, भाजप काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने पाणी उपसा करण्यासाठी लागणाऱ्या वीजबीलापैकी 80 टक्के वीजबील सरकारच्या वतीने भरले जाईल, असा धाडसी निर्णय घेण्यात आला, अशी आठवणही आमदार लांडगे यांनी यावेळी सांगितली.

‘श्रम शिक्षणातून ध्येय पूर्ती’ असे ब्रिद घेवून 1 मे 1982 साली आंबेगाव तालुक्यातील पोखरी या गावी श्री पंढरीनाथ विद्या विकास मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. आजूबाजुच्या 68 वाडी-वस्तीवरील मुले या शाळेत शिकतात. आदिवासी विभागात येणाऱ्या या शाळेला बांधकाम साहित्याची आवश्यकता होती. त्यामुळे आमदार लांडगे यांनी या शाळेला मदत करण्याचा संकल्प केला होता.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn