Pune News : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व

एमपीसी न्यूज – आज पुणे शहरातील विविध प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. पुणे शहरातील 15 पैकी 12 प्रभाग समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकांमधून पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

या सर्व नवनिर्वाचित प्रभाग समिती अध्यक्षांचे पुणे महानगरपालिकेमध्ये अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या. पुणे शहरातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला मिळालेल्या संधीचा सर्व अध्यक्ष कसोशीने आणि कौशल्याने वापर करतील असा विश्वास पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर व सर्व नवनिर्वाचित प्रभाग अध्यक्ष उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.