Pune news: संत निरंकारी मिशनद्वारे रविवारी पुण्यात रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे झोन जनता वसाहत ब्रांचच्या वतीने उद्या (रविवारी) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महापालिका शाळा 124 बी., जनता वसाहत, लेन नं.47,  पुणे येथे रविवारी सकाळी 9 ते 5 या वेळेत शिबिर होणार आहे.

संत निरंकारी मिशनमध्ये रक्तदानाची सुरवात 1986 पासून झाली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एप्रिल 2020 पासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये 15 रक्तदान शिबीर संपन्न झाली आहेत. यामध्ये 1290 युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे संत निरंकारी मिशनचे अनुयायी रुग्णालयामध्ये स्वतः प्लाझ्मा दान   करण्याचे महान कार्य करीत आहेत.

दवाखान्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे ससून रुग्णालय रक्तपेढी, कमांड रुग्णालय रक्तपेढी, वाय.सी. एम. रुग्णालय रक्तपेढी यांच्या विनंतीनुसार संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे.

रक्तदान शिबिरात प्रशासन-डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात येणार असून तसेच सोशल डिस्टंसिंगकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

या महाशिबिरात पुण्यातील नागरिकानी रक्तदान करून या मानवतेच्या कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संत निरंकारी मिशनचे जनता वसाहत प्रमुख गणेश मोरे यांनी केले आहे.

याच प्रकारचे रक्तदान शिबिर ऑक्टोबर 2020 रोजी गंगाधाम,पुणे येथे होणार असल्याची माहिती पुणे झोनचे प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.