Pune News : भाजपाकडून निवडणुका जिंकण्यासाठी बोगस मतदार नोंदणी

एमपीसी न्यूज : काहीही करून निवडणुका जिंकायच्याच या हव्यासातून वाटेल तो मार्ग निवडतात. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून बोगस मतदार नोंदणी झाल्याचा घाणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी पुण्यात केला.

पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारासाठी पाटील यांच्या उपस्थितीत नारायण पेठेतील गुप्ते मंगल कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, उमेदवार अरूण लाड, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, नगरसेवक दीपक मानकर, दिव्या प्रतिष्ठानचे हर्षवर्धन मानकर आदी यावेळी उपस्थितीत होते.

पाटील म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारांच्या चुकीच्या धोरणांमुळे रोजगार आणि उद्योग-व्यवसाय अडचणीत आले. याच काळात पदवीधरांचे अनेक प्रश्न उभे ठाकले. ते सोडविण्यासाठी भाजपचे गतवेळचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी काय केले ? या प्रश्नाचे उत्तर हे नकारात्मक असेल, हे पदवीधरांनी विसरायला नको.

पुणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पदवीधर आहेत. त्यांच्या अनेक मागण्या आहेत. परंतु, त्याची दखल घेतली जात नाही हे वारंवार दिसून येत आहे. मात्र, यापुढच्या पदवीधरांच्या निवडणुकीत मतांची विभागणी होऊ नये. याची काळजी घ्या’.

महाराष्ट्रात पदवीधर हा घटक आता आपल्या दृष्टीने मतदार समजतो. तो घटक मोठा आहे, त्यांना सक्षम करण्याची विशेषत: त्यांना रोजगार देण्याची आठवण ही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतच होते, ही शोकांतिका आहे. या पुढे तसे करून भागणार नाही.

त्यामुळे पदवीधरांचे प्रश्न समजून घेऊन, ते सोडविण्यापुरते मर्यादित न राहाता, पदवीधरांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळात स्वतंत्र खाते स्थापन करावे, असा आग्रह नगरसेवक दीपक मानकर यांनी धरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.