Pune News : कोयत्याने केक कापणं भोवलं, दोघांना अटक 

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे जमाव करून लोखंडी कोयत्याचा वापर करत केक कापणा-या दोघांना अटक केली आहे. हि घटना शनिवारी (दि.12) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कोंढव्यातील एनआयबीएम येथील सार्वजनिक रोडवर घडली.
पोलिसांनी अक्षय अमरुषी शेलार (वय 22 रा. सिध्दार्थनगर कोंढवा खुर्द), कुणाल प्रताप लोणकर ( वय 19, रा. पांडुरंग आळी कोंढवा खुर्द,पुणे ) यांना अटक केली आहे. तर, इतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विनायकराव टपके यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील अटक व इतर आरोपी यांनी बेकायदेशीररित्या जमाव करुन, कोयत्याने केक कापला. पुणे शहरात पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत शस्त्रे, सोटे, तलवारी, बंदुक यांचा मनाई आदेश असताना या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.