-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News: ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या गरोदर प्रेयसीचा खून करुन प्रियकर पोलीस ठाण्यात हजर

सोनमानी दोन महिन्याची गरोदर राहिली होती. ते बाळ त्यांना नको होते. ऑपरेशनसाठी पैसे लागणार होते आणि दोघांकडे पैसे नव्हते. यावरुन दोघांमध्ये वाद झाला.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका प्रियकराने दोन महिन्यामच्या गरोदर प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. सोनमानी कान्हू सोरेन (वय २४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे व किरण बाळासाहेब फुंदे (रा. राजगड प्लाझा, कारेगाव शिरूर) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.14) एक तरुण पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी त्याने कर्मचाऱ्यांकडे पेन आणि एक कागद मागितला. त्यावर त्याने ‘मी तणावात आहे. माझ्याकडून खून झाला आहे. मी माझ्या प्रेयसीचा गळा दाबून खून केला आहे. मला फाशी द्या.’, असा मजकूर लिहून तो कागद पोलिसांकडे दिला. रूमला बाहेरून कुलूप लावून आल्याचे सांगत किल्ली पोलिसांकडे दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तिथे तरुणी मृतावस्थेत आढळून आली.

रांजणगाव एमआयडीसीमधील एका कंपनीत किरण फुंदे आणि सोनमानी मागील काही महिन्यांपासून एकत्र काम करत होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही एकाच ठिकाणी कामाला असल्याने शिरूरमधील कारेगाव येथील राजगड प्लाझा या सोसायटीत ते राहू लागले.

सोनमानी दोन महिन्याची गरोदर राहिली होती. ते बाळ त्यांना नको होते. ऑपरेशनसाठी पैसे लागणार होते आणि दोघांकडे पैसे नव्हते. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादात तिचा गळा दाबून खून केल्याचे किरण फुंदे याने सांगितले. संशयित आरोपी किरणला अटक केली असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn