Pune News : पेशव्यांचे कर्तृत्व सांगणारा मराठा साम्राज्याचा शिल्पाकृती इतिहास उभारण्याची ब्राह्मण महासंघाची मागणी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज: भारताचे व पुण्याचे भूषण असलेल्या व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ‘शनिवार वाड्याला’ नुकतीच 289 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ब्राह्मण महासंघाच्या वतीने एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळेस पेशव्यांचे कर्तृत्व सांगणारा मराठा साम्राज्याचा शिल्पाकृती इतिहास व आंतराष्ट्रीय धर्तीवर कलादालन उभारण्यात यावे, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे.

यावेळेस ब्राह्मण महासंघाच्या वतीने पेशव्यांचे वंशज असलेल्या श्रीमंत उदय सिंह पेशवे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अजिंक्य योद्धा ठरलेल्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा, या सगळ्याला साक्षी असणारा शनिवार वाडा, असा सर्व इतिहास पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची गरज असल्याचे मत उदय सिंह पेशवे यांनी व्यक्त केले आहे.

यावेळेस निवृत्त एअर मार्शल भूषण गेखले, मा. आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक जयंत भावे, दाते आदी उपस्थित होते.

याप्रसंगी महासंघाचे पदाधिकारी केतकी कुलकर्णी, संघटक प्रमुख सुनील शिरगांवकर, ब्रह्मोद्योग आघाडी प्रमुख तेजस फाटक, शाखा अध्यक्ष माधव तीळगूळकर, श्रीकांत देशपांडे, सरचिटणीस राहुल जोशी, विकास अभ्यंकर, राजेंद्र कुलकर्णी, जयश्री घाटे, युवा पदाधिकारी पंकज पतके, प्रफुल्ल खटावकर, सचिन कुलकर्णी, जान्हवी जोशी आदी मान्यवरांनी शनिवारवाडा या वास्तूला मानवंदना दिली.

यावेळेस जिल्हा कार्याध्यक्ष मंदार रेडे यांनी आगामी काळात पेशव्यांचे स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन समितीला दिले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.