Pune News: अंबिल ओढा भिंतीच्या घोटाळ्या प्रकरणी लाचलुचपत विभागाचे पुणे महापालिकेला पत्र , दिले चौकशीचे आदेश

एमपीसी न्यूज: अंबिल ओढा लगत बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीच्या कामांमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी. आणि त्याचा अहवाल तयार करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पाठवावे असे आदेशाचे पत्र लाचलुचपत विभागाने पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पाठवले आहे.

आंबील ओढा संरक्षण भिंत घोटाळ्या बाबत माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र दीक्षित यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.आंबिल ओढ्याला २५ सप्टेंबर २०१९ रोजी आलेल्या महापुरानंतर सीमाभिंतीचा सुमारे ४०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. ओढ्यातील काही भागात भिंत बांधण्याचे कंत्राट सावी आणि टी अँड टी या कंत्राटदारांना संयुक्तपणे १५ कोटी १३ लाख रुपयांना बहाल करण्यात आले. मात्र त्यांनी ते न केल्याने तेच काम आता फेरनिविदेनंतर १८ कोटी ४९ लाख रुपयांमध्ये करण्यात येणार आहे. साडेतीन कोटींच्या या फटक्याशिवाय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणखी सव्वा कोटी रुपयांच्या फटक्यासह सुमारे ५ कोटींचा फटका महापालिकेला बसला. तांत्रिक पूर्ततेअभावी तो १० कोटीपर्यंत गेला. नेमक्या याच कार्यपध्दतीबाबत दीक्षित यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

ठेकेदार सावी इन्फ्रास्ट्रक्चर आणि टी अँड टी इन्फ्रा यांची बयाणा रकमेसह सुरक्षा अनामत रक्कम जप्त करून ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करण्याची कारवाई करणे आवश्यक होते. मात्र टी अँड टी इनफा या ठेकदाराला भविष्यात रिंग करून कोट्यवधींची कामे मिळावीत. या उद्देशाने त्यांच्याविरुद्ध कारवाई हेतूत: टाळण्यात आली. त्यापोटी तत्कालीन अधीक्षक अभियंत्यांना लाखोची लाच दिल्याचा आरोपही दीक्षित यांनी केला होता. निविदा अटी आणि शर्ती तसेच

महापालिका कार्यालयीन आदेश उल्लंघन करीत, कागदोपत्री का करीत एक टक्का रक्कम जप्त यामुळे महापालिकेचे तब्बल १०कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप दीक्षित यांनी केला होता. लाचलुचपत विभागाकडून आदेश आल्याबरोबर तातडीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.