Pune News : घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला 24 तासांत अटक, 3.15 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – फरासखाना परिसरात 25 सप्टेंबर रोजी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला 24 तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 26 सप्टेंबरला आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.

जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड ( रा. आंबेडकर वसाहत, डीपी रोड, औंध ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना परिसरात 25 सप्टेंबर रोजी घरफोडी झाली होती. याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घरफोडीत घरातील सोन्याच्या बांगडया, सोन्याची माळ, सोन्याचे गळ्यातील टॉप्स, सोन्याची अंगठी, तीन पदरी सोन्याचा राणीहार, चांदीची कासवाची कोयरी, लक्ष्मी पुजनातील रक्कम असे एकूण 2 लाख 99 हजार किंमतीचा माल चोरीस गेला होता.

दाखल गुन्हयामध्ये फरासखाना पोलीसांनी तपास सुरु केला. या गुन्ह्यात सहभागी अनोळखी इसम हा पुणे आयुक्तालयाच्या रेकार्डवरील आरोपी जयवंत उर्फ जयडया गोवर्धन गायकवाड हा असून तो औंध येथील घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी औंध येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.

त्याचा गुन्हयाबाबत अधिक तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून 3 लाख 15 हजार किंमतीच्या सोने व चांदी दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित कुमार पाटील हे करीत आहेत.

हि कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर), डॉ. संजय शिंदे, परिमंडळ-1च्या पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मिलींद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दादासाहेब गायकवाड, पोलीस उप निरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस हवालदार बापू खूटवड, सयाजी चव्हाण, अमोल सरडे, आकाश वाल्मीकी, मोहन दळवी, सचिन सरपाले, अभिनय चौधरी, ऋषिकेश दिघे, पंकज देशमुख, गणेश आटोळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.