Pune News : पुण्यातील घरफोडीचे सत्र सुरूच, कोंढव्यात सव्वा दोन लाखांची घरफोडी 

0

एमपीसी न्यूज – पुण्यातील घरफोडीचे सत्र सुरूच असून शहरात घरफोडी व दुकान फोडी थांबविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. कोंढवा परिसरात झालेल्या घरफोडीत 2.22 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. 

याप्रकरणी अनिलकुमार पांडे (वय 48) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिलकुमार पांडे हे उत्तर प्रदेश येथील आपल्या मुळ गावी असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे छप्पर उचकटून घरात प्रवेश केला. या ठिकाणाहून 2 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यामध्ये रोख रक्कम, सोन्या – चांदीचे दागिने व इतर वस्तूंचा समावेश आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.