Pune News : होळी पेटवा पण जरा जपून, अग्निशमनदला तर्फे दक्षतेचे आवाहन

एमपीसी न्यूज – येत्या सोमवारी (दि.6) हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी आहे. हिंदू परंपरेनुसार आजच्या दिवशी होळी पेटवून आपल्यातील वाईट गुणांचे दहन केले जाते. त्यासाठी अगदी घरा समोर ते सामूहीकरित्या ही अनेक ठिकाणी होळी पेटवली जाते. मात्र एखाद्या अपघाताने सणाचा बेरंग होऊ नये त्याआधीच आपण काळजी घ्यावी म्हणून पुणे महापालिकेच्या मुख्य अग्निशमन (Pune News) अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी एक पत्रक जाहीर केले आहे. ज्यामध्ये नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून त्यासाठी ही प्रतिबंधात्मक उपाय त्यांनी दिले आहेत ते पुढील प्रमाणे.

 

1) होळी पेटविताना होळीमध्ये मोठ्या प्रमाणावर जळाऊ पदार्थ अर्पण न करता, लहान स्वरूपातील

होळी पेटवावी.

2) होळी पेटविताना ती मोकळ्या पटांगणावरच पेटवावी.

3) झोपडपट्या ह्या आगीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याने झोपडपट्टी परिसरात नाममात्र

होळीचे पूजन करत असताना दक्षता घ्यावी.

4) लहान मुलांना होळीचे जवळ जाऊ देऊ नये.

5) खबरदारीची उपाययोजना म्हणून होळी पेटविण्यापूर्वी होळीचे नजीक पाण्याने भरलेले लोखंडी पिंप व पाणी फेकण्यासाठी वादल्या उपलब्ध ठेवाव्यात.

6) छप्पर असलेल्या जागेत, विजेच्या ताराखाली होळी न पेटविता, मोकळ्या पटांगणात पेटवावी.

7) होळी जोपर्यंत पेटत आहे. तोपर्यंत लहान मुलांसमवेत प्रौढ व्यक्तींनी होळी जवळ सोबत राहावे.

8) होळीमध्ये फटाके टाकू नयेत.

9) आगीचा प्रादूर्भाव झाल्यास, आगीवर पाणी मारण्याकरिता पाण्याचा साठा त्वरित उपलब्ध राहण्याचे दृष्टीने 200 लिटर्सचे पाण्याचे भरलेले पिंप व पाणीफेकणेकरिता बादली ठेवण्यात यावी.

10) ज्या इमारतीमध्ये एल पी जी रेटिक्युलेटेड सिस्टीम आहे, अशा इमारतीमध्ये एल पी जि सिलिंडर

बैंकपासून दूर अंतरावर होळी पेटवावी व अशा वेळेस सदर (Pune News) बँकेचा काळजीवाहक ( केअर टेकर ) कर्तव्यावर हजर असणे आवश्यक आहे.

 

Pune News : वनरक्षकास शिवीगाळ करणाऱ्या दोघांना अटक

11) वखारीचे आवारात अथवा लगत होळी पेटवू नये.

12) होळीचे पूर्वी दोन दिवस व नंतरचे दोन दिवस वखारीतील रखवालदार किंवा मजूरांना रात्रीचे वेळी जागता पहारा देण्यास सांगावे.

13) आगीचा प्रादूर्भाव झाल्यास, तेथील मजुरांना आगीवर पाणी मारण्याकरिता त्वरित पाण्याचा साठा उपलब्ध राहण्याचे दृष्टीने 200 लिटर्सचे पाण्याचे भरलेले पिंप वखारीमध्ये ठेवावेत. तसेच वखारीचे आवारात वाळूने भरलेल्या बादल्या ठेवण्यात याव्यात.

14) बहुतांशी वखारीचे बाहेर मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त लाकूड साठा केलेला असतो. अशा लाकूड साठ्यामुळे आग एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे सत्वर पसरण्याचा धोका असतो. याकरिता अशाप्रकारे रस्त्यावर लाकूडसाठा राहणार नाही याची दक्षता (Pune News) घेण्यात यावी.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.